भाजप पक्षाच्या कारवाई मुळे मला फरक पडत नाही - ऋषभ बावनकर
पक्षा विरोधात सोशल मीडिया वर केलेल्या पोस्ट मुळे ऋषभ बावनकर पक्षातुन सहा वर्षाकरिता निलंबित
कन्हान : - भाजपा कामगार मोर्चा सचिव जिल्हा नागपुर ग्रामीण या पदावर असलेले ऋषभ बावनकर यांनी पक्षा विरोधात सोशल मीडिया वर पोस्ट केल्याने पक्षाने त्यांना सहा वर्षा करिता निलंबित केले आहे .
कन्हान शहरातील रहिवासी ऋषभ बावनकर मागील काही वर्षा पासुन कन्हान शहर विकास मंच संघटनेच्या माध्यमातुन शहरातील विविध विषय समस्या प्रशासना कडुन सोडविण्यासह सामाजिक कार्यक्रमही करीत आहे . तसेच इलेक्ट्रॉनिक व पोर्टल मीडियाचा पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असुन आपल्या लेखणीचा माध्यमातुन जन सामान्य नागरिकांच्या समस्या , वाढत्या गुन्हेगारी चे प्रश्न शासन, प्रशासना पर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहे .
सन २०१४ मध्ये केंद्रात , राज्यात आणि कन्हान - पिपरी नगर परिषदेत भाजपची सत्ता असल्याने ऋषभ बावनकर यानी शहराचा सर्वांगीण विकास होईल या भावनेतुन भाजपा पक्षात प्रवेश केला होता .
पक्षाने त्यांना प्रसिद्ध प्रमुख या पदाची जबाबदारी दिली होती . त्यांनी प्रत्येक वेळेस पक्षा सोबत राहुन पक्षाच्या आदेशांचे पालन केले. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात पुन्हा मोदी सरकार स्थापन झाले. राज्यात अडीच वर्ष भाजपाला विरोधात राहुन कार्य करावे लागले. एकनाथ शिंदेनी बंडखोरी करुन भाजपा ला साथ दिल्याने राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. या वेळीस देखील ऋषभ बावनकर यांनी पक्षा विरोधात सोशल मीडिया वर पोस्ट आणि अभद्र टिप्पणी केली नाही. त्याचे पक्षात कार्य पाहता पक्षाने त्याला भाजपा कामगार मोर्चा सचिव जिल्हा नागपुर ग्रामीण या पदावर नियुक्त केले होते . शहरातील दुकानदरांवर झालेल्या अतिक्रमण कारवाई मुळे त्यांनी भाजप पक्ष विरोधात सोशल मीडिया वर पोस्ट केल्याने भाजपा कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष रमेश भदाडे यांनी ऋषभ बावनकर यांना सहा वर्षाकरिता पक्षातुन निलंबित केले आहे .
दुकानदरांवर आणि नागरिकांवर अन्याय मी सहन करु शकत नाही - ऋषभ बावनकर
दुकानदारांवर अतिक्रमविरोधी कारवाई केल्यामुळे ऋषभ बावनकर यांनी प्रशासना विरुद्ध तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे . या बाबत त्यांनी सोशल मीडिया वर "माझ्या शहरातील गोर गरिब दुकानदरांवर होत असलेल्या अन्याया विरोधात आणि ग्रोमर वेंचर्स चा मालकाला भाजप च्या वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा मिळत असल्याच्या विरोधात मी भाजप कामगार मोर्चा सचिव जिल्हा नागपुर ग्रामीण या पदावरुन राजीनामा देत आहो" अशी पोस्ट टाकली होती . त्यामुळे पक्षाने त्यांना पत्र पाठवुन सहा वर्षा करिता निलंबित केले .
शहराचा सर्वांगीण विकासा करिता व जनतेसाठी उघडपणे कार्य करील - ऋषभ बावनकर
भाजप पक्षाच्या कारवाई मुळे मला फरक पडत नाही , आता मी आजाद झालो असुन कन्हान शहराचा सर्वांगीण विकासा साठी आणि जनतेसाठी उघडपणे कार्य करील . जनते पर्यंत जाऊन संवाद साधुन त्यांचे प्रश्न समस्या शासन , प्रशासना कडे मांडील. आपल्या शहराचा सर्वांगीण विकासा करिता संघर्ष करत राहील. अशी इच्छा ऋषभ बावनकर यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केली.
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time